१०८ खोल्यांचा भव्य भक्त निवास उभा राहणार
पंढरपूर येथील गोपाळपूर येथे संत गुलाब बाबा आश्रमचा भूमीपूजन सोहळा थाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाला भावीकांचा प्रचंड जनसमुदाय आला होता.पंढरपुर बरोबरच इंदापूर,धुळे , पैठण , बीड, मिरज, डोंगरसोनी तासगांव, अशा अनेक ठिकाणांहून भाविक भक्त आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच विलास म्हस्के हे होते याच बरोबर कार्यक्रमाला भूमीपूजन करण्यासाठी धुळे येथील रहिवासी पुज्य गुलाब बाबांच्या सहवासात राहिलेले सोमनाथ पाटील हे उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन चंद्रकुमार अग्रवाल हे प्रकृती व्यवस्थित नसल्याने उपस्थित राहू शकले नाही,यांनी मोबाईल द्वारे शुभेच्छा संदेश दिला.व पूज्य बाबाजींचे भव्य मंदिर लवकारत लवकर पूर्ण होईल असा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमाची सुरुवात पुजेने झाली.हा भव्य दिव्य असा आश्रम एक वर्षात काम पूर्णत्वास होईल अशी ग्वाही आश्रम संचालक सागर अग्रवाल यांनी दिली आहे.या आश्रमाचे सध्या प्राथमिक काम झाले असून भविष्यात इथे १०८ खोल्यांचा भव्य दिव्य असा भक्तनिवास उभा राहणार असून संत गुलाब बाबा यांचे भव्य दिव्य व आकर्षक असे मंदिर होणार आहे.
या कार्यक्रमात मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास आर्मी मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब झांबरे पाटील उपाधयक्ष एड तानाजीराव देवकर, एड योगेश देवकर, पुणे सहकारी बोर्ड संचालक राजेन्द्र गोलांडे, उद्योजक अशोक हरणावळ, इंदापूर मार्केट कमेटी संचालक सचिन देवकर, ज्ञानेश मुंडे , जितेंद्र, विजय झांबरे, बापू सांगवे, कृष्णा वाघ , प्रशांत जाधव यांची उपस्थिती होती. पुज्य गुलाब बाबांची आरती झाली व महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.