येस न्युज मराठी नेटवर्क : जिल्हा क्रीडा अधिकारी पदी सचिन रणदिवे याची तर पुणे महापालिकेच्या शिक्षक पदी हनुमंत रणदिवे याची नियुक्ती झाल्याबद्दल झारखंड मधील चतरा चे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. बार्शी तालुक्यातील महागाव मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुटुंबीयांच्या वतीने सचिन आणि हनुमंत रणदिवे यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचा उपस्थित नातेवाईकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश घोलप तसेच हिमायतनगर चे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करत सचिन आणि हनुमंत रणदिवे याच्या यशाचे कौतुक केले. रमेश घोलप यांनी देखील आपल्या भाषणात या दोघांनी आणखी मोठे यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी रमेश घोलप यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.