सोलापूर, ९ ऑक्टोबर २०२५: रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्रस्तुत आणि सायंटिफिक सेल्स अँड सर्व्हिसेस, लातूर यांच्या साहाय्याने साईबाबा शाळा, जुना कुंभारी रोड, न्यू विडी घरकुल परिसर येथे आज अत्याधुनिक सायन्स लॅबोरेटरीचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक रोटरी डिस्ट्रिक ३१३२ चे नियुक्त प्रांतपाल रोटेरियन जयेश पटेल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२६-२७) होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकिरण संस्थेचे संस्थापक डॉ. श्रीपाद सुरवसे होते तर माजी प्रांतपाल रोटेरियन झुबिन अमारिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सकाळी ११:३० वाजता आयोजित या भव्य सोहळ्यास अनेक मान्यवर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील विषय नाही, तर अनुभवातून उमलणारे ज्ञान आहे. ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना “करून शिकण्याची” (Learning by Doing) संधी देणार असून, विज्ञानाची आवड, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलतेला चालना देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी प्रयोगशाळेतील साहित्य आणि शैक्षणिक साधनांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सायंटिफिक सेल्स अँड सर्व्हिसेस, लातूर यांनी प्रयोगशाळेतील साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या उदार योगदानाबद्दल रोटरी क्लबने आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साईबाबा शाळेचे मुख्याध्यापक श्री. तिप्पण्णा कोळी तसेच, शिक्षकवर्ग आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर हे सदैव समाजविकासाच्या कार्यात अग्रणी राहिले आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून आजची ही विज्ञान प्रयोगशाळा त्या परंपरेतलं आणखी एक तेजस्वी पाऊल आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटे धनश्री केळकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी सचिव रोटे निलेश फोफलिया, लिटरसी प्रमुख रोटे शिवाजी उपरे, रोटे संदीप जव्हेरी, रोटे सुनील माहेश्वरी, रोटे ब्रिजकुमार गोयदानी, रोटे शांता येळमकर, रोटे आनंद गुंड्याल, रोटे संतोष कणेकर, रोटे आकाश बाहेती, रोटे केशव वळसे, रोटे श्रीकृष्ण व सौ माधुरी गलगली उपस्थित होते.