मुंबई : रिंगणचे संपादक सचिन परब यांनी यंदाही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरुणांमधे संतविचारांचा जागर करण्यासाठी संतविचारांवर आधारित पहिली आणि एकमेव राज्यस्तरीय खुली अशी ही वक्तृत्व स्पर्धा आहे. यासाठी ११ हजार रुपयांचं पहिलं पारितोषिक असून एकूण ४१ हजारांची बक्षिसं प्रदान केली जाणार आहेत.वय गट १५ ते ३ वर्ष असा असेल.
या स्पर्धेविषयी नोंद घ्याव्यात अशा काही गोष्टी
- रविवार, १८ डिसेंबर २०२२ ला आळंदीत मध्यवर्ती ठिकाणी अमृतनाथ स्वामी महाराज संस्था, चाकण चौक इथे
- तरुणांमधे संतविचारांचा जागर करण्यासाठी संतविचारांवर आधारित पहिली आणि एकमेव राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा
- पहिलं पारितोषिक ११ हजार रुपये, एकूण ४१ हजारांची बक्षिसं
विषय असे आहेत
१. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी
२. कीर्तन : प्रबोधन की मनोरंजन?
३. कुणाही जीवाचा न घडो मत्सर
४. संत मुक्ताबाई : महान मोटिवेटर
५. माझा विठोबा, २८ युगं जुना आधुनिक देव
नाव नोंदणी आणि माहितीसाठी संपर्क
प्रविण शिंदे ८४४६६९५४३४
स्वामीराज भिसे ९६५७०७३३३३