सोलापूर, 17 :- लोकसभा सदस्य धाराशिव मतदारसंघ आणि जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा नियोजन भवन येथे केंद्र शासनाच्या सुधारित वितरण व्यवस्थेची (RDSS) व इतर योजनांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये RDSS – फीडर सेपरेशन, लॉस रिडक्शन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, पीएम सूर्यमित्र – हर घर मुफ्त बिजली योजना, पीएम कुसुम योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा समावेश होता. तालुका निहाय सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार कु. प्रणिती शिंदे, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने, तसेच महावितरण कंपनीत कार्यरत कार्यकारी अभियंते, महाउर्जा अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.
मुख्य मुद्दे:
- स्मार्ट मीटर: समिती अध्यक्ष ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महावितरण च्या सेवेबाबत ग्राहकांना स्मार्ट मीटरची उपयोगिता विचारली.
- सिंगल फेजिंग फीडर:गावठाणमध्ये रूपांतर करण्याबाबत महावितरण कंपनीने पाठपुरावा करण्याची सूचना.
-विद्युत वितरण हानी कमी:प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. - सौर कृषी पंप योजना: शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची सूचना.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नवीन उपकेंद्र उभारणीसाठी जागेच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी महावितरण कंपनीने अंतर्गत उपसमिती गठीत करून अहवाल मुख्य समितीच्या बैठकीत ठेवण्याची सूचना दिली.
या बैठकीचा उद्देश विद्युत वितरण प्रणाली सुधारण्याचा आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे आहे.
*