सोलापूर : पुण्यातील व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारल्यानंतर आज शनिवारपासून दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुण्यापेक्षा कोरोना बधितांची संख्या कमी असून देखील सोलापूर बाबत कोणताही निर्णय झालेला नाही सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नेहमीप्रमाणे एक-दोन दिवसात निर्बंध शिथिल करण्याची ग्वाही दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील रुग्ण वाढ अधिक असली तरी सोलापूर शहरांमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी पालकमंत्री भरणे मामा सोलापुरात होते. परंतु त्यांनी निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये निर्बंध कडक करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांना शुक्रवारच्या बैठकीनंतर दिले होते. महापालिका आयुक्तांनी निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रस्ताव पाठवलेला असूनही त्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही . पालकमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत खरोखरच प्रयत्न करणार का? अशी आता व्यापाऱ्यांमध्ये विचारणा होत आहे. पुण्यासाठी मिळणारे होऊ शकतो मग तोच न्याय सोलापूरला का लागू होत नाही असेही आता संतप्त व्यापारी विचारत आहेत.