सोलापूर : विजापूर रोड येथील सुंदरम नगर जवळ असणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड सोलापूरच्या इमारतीचे बांधकाम हे सन 1986 मधील म्हणजेच साधारणतः 35 वर्ष जुने होते. सदर इमारतीची बरीच पडझड झाली होती. सदर इमारती करीता जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यातून तब्बल 35 वर्षांनंतर नूतनीकरण करण्यात आले. सदर कामाचा पाठपुरावा जिल्हा समादेशक होमगार्ड सोलापूर तथा अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल झेंडे यांनी केल्याने जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे रूप पालटले आहे.
तसेच कार्यालयातील संगणक संच हा अत्यंत जुना झाल्याने कार्यालयीन कामात अडचणी येत होत्या, आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी यांच्या आमदार निधी मधून जिल्हा होमगार्ड कार्यालयास तात्काळ अद्ययावत 4 संगणक संच व 4 प्रिंटर पुरविल्याने कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता आली. त्याच प्रमाणे जिल्हा होमगार्ड कार्यालय सोलापूर येथे जागतीक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, आमदार प्रणिती शिंदे, शहर पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर, महानगरपालिका उपायुक्त सोलापूर धनराज पांडे, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण अतुल झेंडे, दिपीका झेंडे, जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी अजयसिंग पवार, सामाजिक कार्यकर्ते व वृक्ष प्रेमी प्रल्हाद काशीद, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, व जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड सोलापूर च्या आवरामध्ये एकूण 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमा करिता रा.पो.नि. काजुळकर, जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. पी. घाडगे, रा. पो. उपनिरीक्षक काटे, जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे विक्रांत मोरे, दळवे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांसोबत बंदोबस्त कर्तव्यावर असणाऱ्या होमगार्ड यांना कोरोना कालावधी मध्ये कल्याणकारी बाबी मधून कोरोना पोझिटिव्ह होमगार्ड यांचे उपचारा करिता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस कल्याण निधीतून वेळोवेळी मदत पुरविली, व वेळोवेळी कर्तव्यवरील होमगार्ड यांच्या अडचणी सोडविल्या.
तसेच सोलापूर शहर हद्दीतील पोलिसां सोबत बंदोबस्त कर्तव्यावर असणाऱ्या होमगार्ड यांच्या मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर अंकुश शिंदे , व मा. पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी वेळोवेळी अडीअडचणी सोडविल्या व होमगार्डच्या कल्याणकारी बाबींचा पाठपुरावा केला, ज्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह होमगार्ड यांना व कर्तव्यवरील इतर होमगार्डना दिलासा मिळाला.