अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर येथे तळमजल्यावर स्थित नूतनीकरण केलेल्या न्युरो आयसीयुचे उद्घाटन मा.चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले.
NABH च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नूतनीकरण केलेल्या ह्या न्युरो आयसीयुमध्ये रुग्णांकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
या आयसीयुमध्ये न्युरोलॉजी विभागातील रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या नूतनीकरण केलेल्या 10 बेडस्च्या न्युरो आयसीयुमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून, त्यामध्ये प्रमुखता व्हेंटीलेटर्स, मॉनिटर्स, सेंट्रल ऑक्सिजन, सेंट्रल सक्शनची सोय उपलब्ध आहे. हा विभाग पूर्णत: सेंट्रल एअरकंडिशन्ड आहे.
या विभागामध्ये न्युरो सर्जन डॉ. शंतनु गुंजोटीकर, डॉ.विजय जोशी आणि न्युरो फिजिशियन डॉ. प्रीतेश अग्रवाल, डॉ. अमर विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली न्युरोलॉजी विभागातील अत्यवस्थ व ट्रॉमाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. याचा गरजू रुग्णांना निश्चितच लाभ होईल.

संस्थेचे मा.चेअरमन बिपीनभाई पटेल व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांसाठी उत्तम दर्जाची व आधुनिक वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी अश्विनी सतत प्रयत्नशील आहे.
या उद्घाटन प्रसंगी व्हा.चेअरमन डॉ. विजय पाटील, संचालक चंद्रशेखर स्वामी, भैरुलाल कोठारी, अशोक लांबतुरे, डॉ. राजीव प्रधान, विलास पाटील आणि डॉ.सिध्देश्वर रुद्राक्षी, डॉ.अतुल कुलकर्णी डॉ.प्रीतेश अग्रवाल, डॉ.अमर विभूते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर, प्रशासकीय अधिकारी सचिन बिज्जरगी आणि बहुसंख्य अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.