• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

फ्रान्स येथील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी

by Yes News Marathi
July 18, 2023
in इतर घडामोडी
0
फ्रान्स येथील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.18 (जि.मा.का.) :- जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होत असते. जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा फ्रांस ( ल्योन) येथे होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील पात्र युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे. यापुर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधुन 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून, सदर स्पर्धा 15 देशात 12आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रांन्स ( ल्योन) येथे होणार आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2002 किंवा तद्वंतरचा असावा तसेच, आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम / हॉस्पिटेलिटी इंस्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इंस्टीट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीकडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करता येईल.

या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडून करण्यात येईल. सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा. तसेच याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट पार्क चौक सोलापुर येथे प्रत्यक्ष भेट द्यावे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्र .0217-2950956 या क्रमांकावर संपर्क साधवा असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त श्री जाधव यांनी केले आहे.

Tags: FranceMahaswayam web portalRegisterWorld Skills Competition
Previous Post

सोलापूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेस सुरुवात…

Next Post

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group