येस न्युज मराठी नेटवर्क : अध्यात्मिक गुरु पू. श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत श्री श्री सेवा महोत्सव अंतर्गत शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून व मा. चंद्रकांत राठी यांच्या मार्गदर्शनाने व महा एनजीओ फेडेरेशनचे संचालक श्री अमोल उंबरजे यांच्या प्रयत्नाने सोलापूर शहर व जिल्ह्यात १५० पेक्षा जास्त गरजू शाळेंसाठी मोफत डिजिटल व ऑडिओ अक्षर ओळख (चार्ट) उपक्रम राबविले. ह्या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस आयुक्त IPS श्री हरिष बैजल यांच्या हस्ते झाले होते.
राज्य समन्वयक व श्रीमंतयोगी युवा प्रतिष्ठानचे महेश कासट, प्रार्थना फौंडेशनचे प्रसाद मोहिते, राज्य समन्वयक व गिरीकर्णिका फौंडेशनचे विजय जाधव, माविमचे राहुल शिंदे, औज मंद्रूप जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत उंबरजे, सुवर्णा चव्हाण यांच्या समन्वयाने चार्टचे वाटप शहर व जिल्ह्यातील शाळांकरिता करण्यात आले आहे.
डिजिटल युगात मुलांना अश्या माध्यमांचा जास्त आकर्षण असल्यामुळे मुलांना अक्षर, अंक, प्राणी, पक्षी इत्यादी लवकर ओळखण्यास खूप मदत होणार आहे.
सदरील उपक्रमाकरिता गरजू शाळा, वाड्या वस्त्यावरील शाळा, वंचित व निराधार मुलांसाठी चालणारे शाळा, ज़िल्हा परिषद च्या शाळा व अंगणवाड्या अश्या प्रकारच्या शाळेची निवड करण्यात आली होती.
महा एनजीओ फेडेरेशनचे संचालक अमोल उंबरजे म्हणाले कि, गुरुदेवांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सुरु केलेल्या यां उपक्रमाचे नक्कीच सार्थक होईल. प्राथमिक शाळांना सुट्ट्या जरी असले तरी आपण महा एनजीओच्या वतीने सामाजिक संस्थेच्या मदतीने डिजिटल व ऑडिओ अक्षर ओळख चार्ट्स शाळेपर्यंत पोहचवले आहेत. बालक वर्गाला अभ्यासाच्या दिशेने प्रेरित करणारा एक अभिनव उपक्रम म्हणून संपूर्ण महाराष्ट्र याचे स्वागत करेल.