अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, उपनगरीय शाखा, सोलापूर चे विविध रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सदर पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त, सुप्रसिध्द व ज्येष्ट अभिनेते मोहन जोशी यांच्या शुभहस्ते, विक्रम कांबळे (सचिव- पाखर संकुल, सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली, सहासिनी शहा (अध्यक्षा:- प्रिसिजन फौंडेशन, सोलापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे अध्यक्ष विजय दादा साळुंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रतिवर्षाप्रमाणे मराठी रंगभुमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, उपनगरीत शाखेच्या वतीने नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या रंगकर्मी ना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी प्रकाश यलगुलवार यांना रंगकर्मी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली पुरस्कार,प्रदिप कुलकर्णी यांना लक्ष्मीनारायण आकेन पुरस्कार, कमलताई हावळे यांना रंगकर्मी संजीवनी काळे पुरस्कार, गोविंद दाते यांना रंगभुमी संवर्धक सिध्दा पाटील पुरस्कार यांना जाहीर झाले आहेत. रोख २५०० रुपये, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच प्रतिवर्षी देण्यात येणारे सुशीलकुमार शिंदे गौरव पुरस्कार जाहीर झाले असून राजु गायकवाड यांना रंगकर्मी गौस शेख पुरस्कार,अमोल कुलकर्णी यांना रंगकर्मी विष्णु संगमवार पुरस्कार, श्रुती मोहोळकर यांना रंगकर्मी राजु मोडक पुरस्कार, श्रध्दा हुल्लेनवरु यांना रंगकर्मी अपर्णाताई रामतीर्थकर पुरस्कार, धनंजय गोडबोले यांना रंगकर्मी महेश जोशी पुरस्कार, शैलेश वाडकर यांना रंगकर्मी जितेश देडे पुरस्कार, श्रध्दा कुलकर्णी यांना रंगकर्मी कमलताई ढसाळ पुरस्कार, अमित मोरे यांना रंगकर्मी सुहास वर्तक पुरस्कार,गिरीष देवकते यांना रंगकर्मी आनंद कुलकर्णी पुरस्कार, वैशाली बनसोडे यांना रंगकर्मी प्रमोद खांडेकर पुरस्कार,वर्षा मुसळे यांना रंगकर्मी आनंद तुळशीगार पुरस्कार, सांची कांबळे यांना रंगकर्मी कल्पनाताई काळे पुरस्कार, या सर्व रंगकर्मी सुशिलकुमार शिंदे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
तसेच शाखेचे सभासद असलेल्या रंगकर्मी ची विविध शासकीय समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये मा. शोभाताई बोल्ली यांची मराठी नाटय अनुदान मंडळ, मुंबई सदस्यपदी, मीरा शेंडगे रंगभुमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळ, मुंबई सदस्यपदी व आशुतोष नाटकर वृध्द कलावंत मानधन समिती, मुंबई सदस्यपदी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. तसेच डॉ मीरा शेंडगे यांच्या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
सदरचा सोहळा बुधवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व नाटय रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरी शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजय साळुंके, नियामक मंडळ सदस्य जयप्रकाश कुलकर्णी, सदस्य दिनेश शिंदे, प्रमुख कार्यवाह प्रशांत शिंगे, कोषाध्यक्ष कृष्णा हिरेमठ, उपाध्यक्ष शशिकांत पाटील , सहकार्यवाह सुशांत कुलकर्णी आदि उपस्थित होते.