येस न्युज मराठी नेटवर्क : पतंजली योग समिती व लोकमंगल उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रभारी सुधा ताई अळ्ळीमोरे यांच्या सहकार्याने जुळे सोलापुरातील कुबेर लक्ष्मी मंगल कार्यालयात 20, 21व 22 जुलै रोजी स्वामी आनंद देव महाराज शास्त्र शुद्ध योग धडे देणार आहेत .
इंडियन मॉडेल स्कूल मधील प्रांगणात गेल्या 17 वर्षेपासून सातत्याने योग वर्ग असणारे प्रथमेश प्राणायाम वर्गातर्फे या शिबीराचे नियोजन सकाळी 6 ते 8 केले आहे . जुळे सोलापुरातील रहिवाशांनी योग करण्यासाठी चे साहित्य ( मँट , सतरंजी , पाणी बाँटल ) सोबत घेऊन यावे . या शिबिराचा लाभ साधकांनी घ्यावा .