सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी गावचे प्राध्यापक रामचंद्र शंकर जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यांनी सादर केलेल्या आधुनिक संत कवियत्री कवियत्री संतामाई निंबाळकर यांचा वाड्मयाचा समग्र अभ्यास या शोध प्रबंधासाठी नुकतीच पीएचडी ही सन्मानाची पदवीधर जाहीर केली आहे.
पीएचडी साठी त्यांना डॉक्टर श्यामा घोणसे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक रामचंद्र जाधव यांचे शालेय शिक्षण संजीवनी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज माणेगाव येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे झाले आहे. वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट आणि नेट या दोन्ही परीक्षा ते यापूर्वी उत्तीर्ण झाले आहेत. शेतकरी कुटुंबात आर्थिक हालअपेष्टावर मात करीत जाधव यांनी शिक्षण क्षेत्रातील सन्मानाची पदवी मिळवल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. जाधव हे लहानपणापासून उत्तम प्रवचनकार अनेक कीर्तनकार असल्याने संत साहित्य हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला या आवडीतून त्यांनी संताबाई या अक्षरशत्रू असलेल्या संत कवियित्रीच्या 2000 अभंगावर आपला शोध प्रकल्प सादर केला. त्यांनी विविध साहित्य संमेलनातून सहभाग नोंदवला त्यांच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. चैतन्याचा अभंग महामेरू श्रीपाद बाबा हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला असून सुरुवातीला विनाअनुदानित महाविद्यालयात नोकरी केल्यानंतर गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
जाधव यांच्या यशाचे त्यांचे आई-वडील मित्रमंडळी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. त्यांच्यासाठी डॉक्टर श्याम घोणसे, डॉक्टर तुकाराम रोंगटे, डॉक्टर प्रभाकर देसाई, डॉक्टर सतीश बडवे, प्रेमा लोकुरवाळे, डॉक्टर सुवर्णा गुंड, डॉक्टर राजेंद्र डॉक्टर, भारती खेडकर यांनी अभिनंदन केले पुढील काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याच्या माणूस असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले