पालिका आयुक्त पी.शिवशंकर साहेब यांच्या शुभहस्ते महापूजा संपन्न झाली.
येस न्युज मराठी नेटवर्क : श्री गणेश आगमन मिरवणुकीची पूजा दत्त चौक येथे दुपारी १.०० वाजता भक्तीभावाने पालिका आयुक्त पी शिवशंकर,माजी नगरसेवक विक्रांत मुन्ना वानकर, प्रतापसिंह चौहान काका, काशिनाथ तात्या डोंगरे यांचा शुभ हस्ते महापूजा संपन्न झाली. महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेली सोलापूरचे लेझीमचे मर्दानी खेळ पाहून पालिका आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनीही लेझीमचा ठेका धरला. मंडळातील 300 हून अधिक सदस्यांनी लेझीमचा शिस्तबद्ध भव्य दिव्य भारदार डाव सादर केले. यावेळी वरून राजाने ही आपली उपस्थिती दर्शविली. भर पावसात मंडळाच्या सदस्यांनी बहारदार लेझीम डाव सादर केले. दत्त चौक, नवी पेठ, मेकॅनिक चौक, मार्गे कृष्णा लॉज येथे मिरवणूक पार पडली. सायंकाळी सात वाजता स्थापनेची पूजा मंडळात आल्यानंतर माजी नगरसेवक व मंडळाचे संस्थापक देवेंद्र राजेश कोठे, उत्सव अध्यक्ष यश शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळीस परिसरातील महिला बालगोपाल तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते