सोलापूर : राज्य शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार राजा माने यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानिमित्त माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी श्री. माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वरिष्ठ पत्रकार प्रशांत माने, राजाराम मस्के उपस्थित होते.
राज्य शासनाकडून शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर नुकतीच ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारांच्या आरोग्य व उपचार विषयक समस्या, आकस्मिक संकटे या सारख्या विषयांसाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूद करुन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची स्थापना केलेली आहे.