सोलापूर : कोणार्क एक्सप्रेस सोलापूर कडे येत असताना एसी थ्री टायर मधील बी 3 कोच मध्ये सुबाह कमलेश्वर साहू (वय २७) या महिलेस प्रसव वेदना तीव्र होऊ लागले होते. दरम्यान कुर्डूवाडी पासून या वेदना सुरू होते. टीसी सुजीत कुमार पंडित यांनी रेल्वे पोलिसांना फोन करताच रेल्वे महिला काॅस्टेंबल पल्लवी रहांगडले, वैष्णवी दबडे यांनी तात्काळ अश्विनी हीॅस्पीटलशी संपर्क साधून रूग्णवाहिका व डाॅक्टर ना पाचारण केले.



स्ट्रेचरचे सहाय्याने महिलेस रेल्वे स्टेशन वरून तात्काळ अतिदक्षता वैद्यकीय गेटने अॅम्बुलन्स मध्ये बसवून त्यांना अश्विनी हाॅस्पीटल मध्ये दाखल केले. पल्लवी रहांगडले, वैष्णवी दबडे या दोघींच्या तत्परतेने गरोदर महिलेचे प्राण वाचले. प्रसव वेदनेने तळमळणारे महिलेस पोलिस कर्मचारी यांचे मदतीने जीवदान मिळाले आहे. त्यांचे समवेत पोलिस उप निरीक्षक भाजीभाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस काॅस्टेबल जाधव , पो.काॅ. पवार, पोकाॅ. बनसोडे, पो.काॅ. जाधव यांनी सहकार्य केले.