सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे मुळेगाव तांडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच १२ जणांना ताब्यात घेतले, उर्वरित दहा पसार झाले. ही कारवाई ग्रामीण गुन्हे शाखेने केली. यामध्ये १.१७ लाख रोख, ११ दुचकी, ५ मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, समीर शेख आदींनी पार पाडली.