साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!… ग्रंथदिंडी निघाली वाजत गाजत

0
58

येस न्युज नेटवर्क : आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. मात्र अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

दुसरीकडे संगीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून प्रस्थान ठेवले. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिराण खोसकर यांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर भुजळांनी हाती विणा धरला आणि उपस्थितांनी माना डोलावल्या.