सोलापूर : सदिच्छा आणि आनंद जिथे राहतात तिथे आत्म्याचे प्रकाशकिरण तेजाने तळपतात हाच पूर्णयोग असल्याचे योगी अरविंद यांनी म्हटले आहे असे प्रतिपादन निरूपणकार विवेक घळसासी यांनी शुक्रवारी केले.
पूर्णयोगाचे चिंतन नव्याने योग मार्गावर येणाऱ्या लोकांना क्लिष्ट वाटू शकते, असे सांगून घळसासी म्हणाले की, पद्दू चेरी येथे 22 ते 24 वर्षे एकाच खोलीत चिंतन केल्यानंतर योगी अरविंद यांनी चिंतन केल्यानंतर विश्व कल्याणासाठी हा पूर्ण योग आपल्याला दिला आहे. यश आणि प्रापंचिक सुखाच्या पलीकडचे जे काही आहे त्याचा मूलभूत विचार उपनिषदांमध्ये आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. योग हा महायोगाचा अंश मात्र भाग आहे असे सांगून घळसासी म्हणाले की सर्व योगांची परिणती मोक्ष हवा चिंतामुक्ती हवी हीच आहे. ईश्वर व जगत या दोन्ही टोकांचा समन्वय ज्या ठिकाणी होतो त्याला योगी अरविंद असे म्हणतात. समाधी पर्यंत पोहोचणे हाच उत्क्रांतीचा उद्देश नसून मत्स्य अवतारापासून कृष्ण अवतारा पर्यंत उत्क्रांतीचा टप्पा संपत नाही. योगी अरविंद म्हणतात दिव्यतेचा अनुभव घेण्यासाठीच आपला जन्म आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. ब्रम्हांडातील जाणिवेशी नाते जोडण्यासाठी हा योग आहे.
अमरत्वाच्या प्राप्तीसाठी सावित्रीने यमाशी साधलेला संवाद म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी व्यक्तिशः अमरच आहेत परंतु त्या जेव्हा समूहात कार्यरत होतात तेव्हा त्या झिजतात मृत होतात आणि पुनरुज्जीवीतही होतात. जाणिवेचा विकास करीत असताना मन शरीर आणि प्राण या तिन्ही मधील प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्राणामध्ये जन्मोजन्मीच्या वासना आणि विकार असल्याने प्राण व शरीर परिवर्तनाला विरोधक करीत राहतात. पहिला विरोध घरातूनच होतो.
Knowledge ij within हे लक्षात घेऊन हात उतरायला लागले की, चुकीच्या कल्पना द्वेष हळूहळू नाश्ता होत जातो. आवरण महत्त्वाचे नसून सावरणे महत्त्वाचे असते असे सांगून घळसासी म्हणाले की, अंतरात्म्याच्या संपर्कासाठी आवरणे दूर करणे महत्त्वाचे आहे.
मुल हसण्या- रडण्याचे प्रशिक्षण कोठे घेते असा सवाल करत ते म्हणाले की, उपनिषदात हिरणमयी पात्र असा उल्लेख आढळतो. श्रेष्ठ जाणीव पर्यंत पोहोचणे हा गोड अनुभव असतो. तो माझ्याकडून करवून घेत आहे, ही भावना जागृत व्हायला हवी.
मन प्राण आणि देह हे आत्मतत्त्वाच्या ताब्यात आहेत. बुडणे हा अपघात असतो परंतु तरणे हा निसर्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्णयोग श्वास घेण्यापेक्षाही सोपा असल्याचे सांगत घरसासी म्हणाले की, समर्पणात अट नसावी. सगळे ईश्वराधीन करता आले पाहिजे. आत्मसमर्पण, साक्षीभाव आणि त्यानंतर सर्व वस्तुमात्रात भगवंत दिसायला हवा. योगी अरविंद म्हणतात “ओपन युवर ऑल विंडोज ” त्याग करता यायला हवा… अव्यवस्थेचा त्याग आणि कलहाचाही त्याग करायला करायलाही जमले पाहिजे. सोलापूर सारख्या पावन भूमीत वीरशैव तत्त्वज्ञान आचरणात आणायला हवे शरणागतीशिवाय पर्याय नाही हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायला हवे. म.सा.प. दक्षिण सोलापूर शाखा आणि आर्यन क्रिएशन यांनी आयोजित केलेल्या आणि पुना गाडगे आणि सन्स यांनी प्रायोजित केलेल्या निरूपणाचा हा पहिला दिवस होता.