येस न्युज मराठी नेटवर्क : अमेरिकेमधील सिअॅटल शहरामधील एका रुग्णालयामध्ये करोना लसीचा साठा करुन ठेवलेला मोठ्या आकाराचा फ्रीज अचानक खराब झाला. त्यामुळे मध्यरात्रीनंतर स्थानिकांचे लसीकरण करण्यात आलं.करोनाच्या लसी खराब होतील हे समजल्यानंतर गुरुवारी रात्री ११ वाजल्यानंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना तातडीने करोना लसीकरण केंद्रावर येऊन लस घ्यावी असे मेसेज पाठवले. त्यानंतर अनेकजण आहेत त्या घरच्या कपड्यांमध्येच लस घेण्यासाठी केंद्राबाहेर लागलेल्या रांगेत उभे दिसले.मेसेज पाठवण्यात आल्यानंतर तासाभराच्या आत शहरातील दोन मोठ्या मेडिक केंद्रांबाहेर लस टोचून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आलं. काहीजण पायजम्यात होते तर काही नाईट ट्रेसमध्ये तर काही अगदीच अंघोळीनंतर घालतात त्या बाथ कोटमध्ये रांगेत उभे असल्याचं दिसून आलं. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मॉडर्नाच्या लसीचे १६०० डोस खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मध्य रात्रीपासून सकाळपर्यंत स्थानिकांना लस देण्याचं काम अवितरतपणे सुरु होतं.