पुल्ली कन्या प्रशालेचा दहावीचा निकाल – 97.40%

0
54

सोलापूर- उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , सौ भू म पुल्ली कन्या प्रशालेचा इ 10 वी निकाल 97.40% लागला . एकूण 270 विद्यार्थिनीं पैकी 263 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. 54 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह तर 108 विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.कार्तिकी बुधाराम हिने 92% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर प्रीती उडता- 91.20% द्वितीय क्रमांक , अंकिता सिरसाल – 91% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम , उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी , सचिव दशरथ गोप , सहसचिव संगीता इंदापुरे , खजिनदार नागनाथ गंजी , शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्याल , सर्व विश्वस्त , मुख्याध्यापिका गीता सादुल , उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम , पर्यवेक्षिका जाहिदा जमादार , अधीक्षक अंबादास रच्चा , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.