येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर येथे “झेंगट” कादंबरीचे प्रकाशन रविवारी दि १८ जुलै २०२१ रोजी धुमाळ गुरुजी, दयानंद कॉलेजाचे मराठी विभाग प्रमुख राजशेखर शिंदे, सोलापूर विद्यापीठातील मराठीचे प्रा.डॉ. दत्ता घोलप, प्रा. येळेगावकर, जेष्ठ कवी रा ना पवार यांचे पुत्र व कवी माधव पवार या मान्यवरांच्या हस्ते झाले. तर केन्द्रीय राज्य शिपिंग, पोर्ट आणि पर्यटन मंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर दिल्ली येथे केले.
