माढा : ‘ संत सावता माळी : अभंग आणि विचार ‘ , प्रो.डाॅ.सौ.सुवर्णा चव्हाण – गुंड लिखित पुस्तकाचे प्रकाशन महामंडलेश्वर मनिषानंद महाराज पुरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कॅबिनेट मंत्री मा. छगणजी भुजबळ, आयोजक गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर इत्यादी संत, महंत व सन्माननीयांच्या हस्ते पार पडला.
मा.उपमुख्यमंत्री यांनी संत सावता महाराजांच्या विचारांची, कर्मयोगी जीवननिष्ठेची उदाहरणे दिली.सावतोबांच्या कृतिशील विचारांची आज नितांत गरज असल्याचे विचार मांडले. आयोजक मा.अतुलजी सावे यांनी आपल्या कृती आणि उक्तीप्रमाणे सावतोबांच्या विचारांची आधार दिला उभारली. मा.छगण भुजबळजींना ,’ संत सावता माळी : अभंग आणि विचार ‘ या पुस्तकाचं मनःपुर्वक स्वागत केले. संत सावता माळी यांच्या प्रत्येक पैलूंचा संशोधनात्मक रितीने प्रो.डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण या लेखिकेने परामर्श घेतला आहे. उदा. संत सावतोबांनी पर्यावरण, शेतीची पद्धती , आरोग्यासाठीचे विचार, औषध तयार करणं, मानसिक आरोग्य, सात्विक जीवन पद्धती, जीवनशैली, निष्ठा.. इत्यादी अनेक पैलूंवर सखोलपणे मांडणी केली आहे.आपण हे पुस्तक आवर्जून वाचावे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सौ.रुपाली चाकणकर व मान्यवरांनी ,’ संत सावता माळी अभंग आणि विचार ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भरभरून सदिच्छा व्यक्त केल्या. अनेक राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा दिल्या.
मा.सावता वसेकर महाराज, मा. प्राचार्य सावता घाडगे, चित्रकार सावता घाडगे, प्रकाशक धनंजय चव्हाण, डॉ. संजय गुंड, प्रभु महाराज तुळशीकर , वसेकर महाराज , उपस्थित तमाम जनसमुदायातुन अनेकजण सावतोबांच्या भक्तीने, निष्ठेने विचार जाणून घेतले या विचारांची आज अत्यंत गरज असल्याने विचारांची देवाणघेवाण झाली.’ संत सावता माळी:अभंग आणि विचार ‘, चा प्रकाशन सोहळा भक्ती निवासाच्या कोणशिला उद्घाटनप्रसंगी सावतोबांच्या अरण नगरीत थाटात संपन्न झाला.