सोलापूर – डॉ. रवींद्र चिंचोलकर लिखित ‘राजकारण आणि पत्रकारिता’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर येथे आयोजित करण्यात आले आहे .
या प्रकाशन सोहळ्यास भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व दक्षिण सोलापूरचे विदयमान आमदार सुभाषबापू देशमुख हे प्रमुख पाहुणे आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठाचे माजी कुलगुरू प्रा . सुधीर गव्हाणे प्रमुख वक्ते तर हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रा .श्रीकांत येळेगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत . राजकीय विश्लेषक राजा माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डिजिटल मिडिया पत्रकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार बाबर , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक अदेप्पा यांची उपस्थिती राहणार आहे .
या सोहळ्यास विद्यार्थी , नागरिक , ग्रंथप्रेमी, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे तसेच अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष पी.पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
पत्रकारिताच्या क्षेत्रात मागील पस्तीस वर्षे कार्य केलेले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केलेले डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विदया बुक्स पब्लिशर्स ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे .
राजकारण आणि पत्रकारिता या क्षेत्रातील परस्पर संबंध, या दोन्ही क्षेत्रांचा परस्परांवर होणारा परिणाम, राजकारणाचे माध्यमीकरण,भारतातील विविध राजकीय पक्षांची विचारसरणी व कामगिरी,निवडणूक आयोगाची भूमिका आणि कार्य तसेच राजकीय जनसंपर्क इत्यादी बाबत या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे .
राज्यशास्त्र व पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विदयार्थी यांन नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार उपयुक्त ठरेल तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्ती,अभ्यासक यांनाही उपयुक्त ठरेल अशा रितीने पुस्तकाचे लेखन केलेले आहे .
डॉ, रवींद्र चिंचोलकर
( मो – 9860091855)

