महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबीराचे उद्धाटन
राज्यातील 14 जिल्ह्यातुन 40 अध्यापकांचा सहभाग
सोलापूर-राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराचे कौशल्य विकशित व्हावे हा महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबीरास असलेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातुन 40 प्राध्यापक उपस्थित राहिले आहे. या प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा बोलत होत.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हरसिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, सह समन्वयक डॉ. श्रीराम राऊत, डॉ. रिंकेश छेडा, डॉ. अभिजित जगताप उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन प्रशिक्षण शिबीराचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. दामा म्हणाले, जगात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. त्यामुळे रोजगारांच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्यपुर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या माध्यमातुन अध्यापकांना प्रशिक्षीत केले जात आहे. या प्रशिक्षणात प्रशिक्षण घेणार्या अध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्य पुर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा. असेही डॉ. दामा यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षण शिबीराचे प्रस्ताविक करताना डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकशित करणे हाच शिक्षणाचा पाया आहे. त्यासाठी पहिल्यांना अध्यापक हा कौशल्यपुर्ण असावा. यासाठीच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मिथिलेश भाकरे, रिंकेश छेडा, डॉ. अभिजित जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे आणि तारीक तांबोळी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. श्रीराम राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्यविकास केंद्राचे सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.