प्रोफेसर सुवर्णा गुंड-चव्हाण यांना ,’ संत सावता माळी : अभंग आणि विचार ‘ या ग्रंथास संतनगर , कांगोणी , नेवासा येथे,’ संत किसन महाराज सुडके जीवन गौरव पुरस्काराने ‘ सन्मानित केले. खासदार निलेशजी लंके यांच्या हस्ते सुवर्णा धनंजय चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘ संत सावता माळी अभंग आणि विचार ‘ या ग्रंथातून सावतोबांचा विचार व आचरणातून जसा आहे तसा तो तळागाळापर्यंत पोहचवला. तसेच अभंगाच्या रुपाने व अभंग विश्लेषणाच्या माध्यमातून हा कर्मयोग अतिशय वाचनीय झाल्याचे याप्रसंगी उल्लेख केला गेला.
संत किसन महाराज सुडके यांच्या बावीसाव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिकांच्या सन्मान सोहळ्यात बोलताना खा.निलेशजी लंके यांनी सावतोबांच्या ग्रंथाविषयी वरील उल्लेख केला. या सोहळ्याचे आयोजक संत किसन महाराज सुडके यांचे वंशज ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुडके व ह.भ.प. चि.ओंकार महाराज सुडके हे होते. त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन राजकीय, अध्यात्मिक, सामाजिक, व्यावसायिक , पत्रकारिता व साहित्यिक क्षेत्राला एका सुत्रात बांधून अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांनाच बरोबर घेऊन समाज उपयोगी असे नेटके कार्य साहित्यिक पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून पार पाडले.
ग्रंथांला गौरविण्यात आले तेव्हा अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर संस्थान, नेवासा संस्थचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंगजी अभंग लाभले. त्यांनी ग्रंथाला आशीर्वादरुपी कोंदणाने व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.नामदेव महाराज पोपळे, ह.भ.प.जनाधऀन महाराज मुंडे यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळ्या पार पडला. यासाठी महाराष्ट्रातील सर्वदूर अशा विविध जिल्ह्यातूनही साहित्यिकांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती. तसेच राजकीय, अध्यात्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक अनेक क्षेत्रांतील मान्यवर, श्रोते, संत किसन महाराज सुडके यांचे अनुयायी उपस्थित होते .
संत किसन महाराज सुडके जीवन गौरव पुरस्काराने प्रोफेसर सुवर्णा गुंड-चव्हाण यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेवासा येथील वेदांताचार्य देवीदास महाराज मस्के , गायनाचार्य माऊली शिंदे, सन्माननीय बळीराम (काका) साठे, मा. कुलगुरू महोदय प्रकाश महानवर , उप.कुलगुरु लक्ष्मीकांत दामा , डायरेक्टर डॉ. संजय गुंड , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रोफेसर प्रदिपजी खेडेकर, प्रांत महामंत्री डॉ.वैभव नरवणे , अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ दिल्ली, शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व परिवार ह.भ.प. आनंद चव्हाण , प्रकाशक वितरक अक्षय टेकले. डॉ . कृष्णा इंगोले, उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे, बील्डर असोसिएशन अध्यक्ष किशोरी चंडक, प्राचार्य सावता घाडगे , प्राचार्य विजय गुंड, ह.भ.प.तथा उद्योजक मनोज शहा, संपादक प्रशांत माने, वृत्तपत्रनिवेदक शिवाजी भोसले, प्रकाशक राजेंद्र भोसले. वृत्तपत्र लेखक अरविंद मोटे. कवी रामप्रभू माने, लेखिका संध्या धर्माधिकारी,व्यवस्थापन तज्ज्ञ योगीराज चव्हाण, चित्रकार सावता घाडगे, दिग्विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले.
