सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाच्यावतीने डेक्स्टर इन्नोफेस्ट-2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण बालाजी अमाईन्सचे संचालक राम रेड्डी आणि विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेचे उदघाटन संगणकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. विकास घुटे यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सोलापूर, सांगोला, मोहोळ, बार्शी, पाणीव, लातुर व धाराशिव येथील विविध महाविद्यालयातील संगणकशास्त्र या विषयातील 403 पदवी व पदवीव्युत्तर विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग व पेपर प्रेझेंटेशनसाठी सहभाग नोंदविला होता. यास्पर्धेसाठी डॉ.सोमनाथ थीगळे, डॉ. व्ही.जी.चव्हाण, डॉ.के.एस.काझी, ए.एस.शिंपी यांनी परिक्षकाचे काम पाहिले.
कुलगुरू प्रा.प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संचालक प्रा.विकास घुटे, डॉ.आर.एस.मेंते, डॉ.जे.डी.माशाळे, डॉ. ए.आर.शिंदे, डॉ.एस.डी.राऊत, प्रा.सी.जी.गार्डी, डॉ.ए.एम. चव्हाण, ए.टी.चौगुले, डॉ.ए. एस.साखरे, श्री वाघमारे एस.के., पोटे संदीप, सोलनकर, मलशेटटी तसेच संकुलातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सायली शेळके यांनी केले तर डॉ. एस .डी.राऊत यांनी आभार मानले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित डेक्स्टर इन्नोफेस्ट-2024 या स्पर्धेमधील विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करताना उद्योजक राम रेड्डी, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रा. विकास घुटे, डॉ. आर. एस. मेंते व अन्य.