राष्ट्रपती निवडणूक : लालू प्रसाद यादव, सायरा बानो यांचे उमेदवारी अर्ज दाखल

0
13

येस न्युज नेटवर्क : देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा, बैठकांना सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, त्यांनी उमेदवारीला नकार दिला. सत्ताधारी गोटातही उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे काही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 11 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोणाचे अर्ज दाखल

 1. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू
 2. जीवन कुमार मित्तल, दिल्ली
 3. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
 4. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
 5. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू
 6. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
 7. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
 8. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
 9. लालू प्रसाद यादव, बिहार
 10. ए. मणिथन, तामिळनाडू
 11. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश