येस न्युज मराठी नेटवर्क : प्रिसिजन समूहाने आज राज्य शासनासमोर आपल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचं सादरीकरण केलं.मुंबईतील सह्याद्री शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे, परिवहन सचिव आशिषकुमार सिंग, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे हे उपस्थित होते.
प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा व कार्यकारी संचालक करण शहा यांनी सर्वांना भारतातील पहिल्या मध्यम आकाराच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची सविस्तर माहिती दिली. या बसची फिल्मही दाखविण्यात आली. राज्य शासनाने प्रिसिजन समूहाच्या या बसचं व रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाचं कौतुक केलं.