सोलापूर : माघवारीची पूर्व तयारी करा असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. सर्व दिंडी प्रमुखांना काळजी वाटत होती की, कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे वारी होईल की नाही. वारी करणेसाठी वारकरी खूपच आतुर आहेत. रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, इ. सर्व काही पूर्ववत होत आहे. त्यामुळे वारीला पूर्ववत करून परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी, पालकमंत्री, प्रशासन यांना वारकरी मंडळाचे शिष्ट मंडळ भेटून चर्चा ही केली होती. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. भागवत महाराज चवरे (पंढरपूर) यांनी ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्रांत अधिकारी गजानन गुरव साहेब यांनी संबंधित सर्व अधिकारी, प्रमुखांना वारीची पूर्व तयारी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यंदा माघवारी होणार असून सर्व वारकरी दिंडी प्रमुखांनी आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन करावे. त्यासंबंधि प्रबोधन करून जनजागृती करण्याचे भाविक वारकरी मंडळाने निर्धार केला आहे. प्रत्येकाने दोन लसघेणे गरजेचे आहे. तसेच लस घेतल्याचे प्रमाणपत्र, मास्क, सॅनिटाईज, इ. ची जागृती करणार आहोत. सध्य परिस्थिती विचारात घेऊन वारीचे नियोजन करावे लागेल. पालखी सोहळा, रिंगण सोहळा करणेसाठी प्रशासन लवकरच निर्णय जाहीर करेल अशी आशा आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाला सर्व वारकरी व दिंडी प्रमुख सहकार्य करतील. प्रत्येक वर्षी वारी कालावधीत प्रशासनाकडून सहकार्य असते. तसे यंदाही मिळेल. प्रशासनाकडून अधिकृत ज्या सूचना जाहीर होतील त्याचे सर्वानी काटेखोर पणे पालन करून वारी परंपरा टिकवावी, असे ही या प्रसंगी सांगण्यात आले. वारी होणार आहे याचा सर्व वारकरी भाविकांना जो आनंद झाला आहे तो शब्दात मांडता येत नाही. वारी तयारीला वेळ खूपच कमी आहे पण वारी होणार या आनंदात तयारीचा ताण जाणवणार नाही असे भाविकांना वाटते. ६५ एकर पंढरपूर, लाईट, पिण्याचे पाणी, पोलीस बंदोबस्त, आरोग्य केंद्र, आलेल्या सर्व भाविकांना लस देणेचे नियोजन संदर्भात लवकरात लवकर निर्णय जाहीर होईल अशी अशा आहे.
या प्रसंगी सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, जोतिराम चांगभले, संजय पवार, किरण चिप्पा, किसन कापसे, विष्णू लिंबोळे, सचिन गायकवाड, इ. अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.