प्राणी संग्रहालय व STB प्लांट,शहरातील उड्डाणपूल प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक….




सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालय,शहरातील उड्डाणपूल व Sewage Treatment cum Biogas (STB) प्लांट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी व सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज मिटिंग हॉल येथे मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य आर्थिक सल्लागार मा. प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीत भुयारी गटारी योजना, अमृत व नगरोत्थान योजना (राज्यस्तर), सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), देगाव टर्शरी ट्रीटमेंट प्लांट प्रकल्प, तसेच महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा विकास आराखडा (DPR) व उड्डाणपूल प्रकल्प यावर सविस्तर चर्चा झाली.अमृत व नगरोत्थान योजनांची प्रगती शहरातील भुयारी गटारी योजना, अमृत योजना व राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतील कामांची सद्यस्थिती व प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अडचणींचे निराकरण व तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले.देगाव STP व NTPC सहकार्य देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात टर्शरी ट्रीटमेंट प्लॅन्ट उभारून प्रक्रिया केलेले सांडपाणी NTPC ला देण्याची योजना संदर्भात चर्चा झाली. या उपक्रमाअंतर्गत NTPC मार्फत मनपाला 72 MLD क्षमतेची पाईपलाइन पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देण्याची योजना असून, यामुळे शहरातील जलसंपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा विकास महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी 2025 ते 2030 पर्यंतचा 5 वर्षांचा डीपीआर (विकास आराखडा) तयार करण्यात आला असून, फेजवाइज काम हाती घेण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी NTPC कडून CSR फंड व DPC मार्फत काही निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित निधी अन्य स्रोतांतून मिळवण्याबाबतही चर्चा झाली.उड्डाणपूल प्रकल्पावर चर्चा शहरातील वाहतुकीस चालना देणाऱ्या उड्डाणपूल प्रकल्पाच्या तांत्रिक व आर्थिक अडचणी, तसेच भविष्यातील अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना प्रस्ताव सादर करून शासनाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी अमोलसिंग भोसले,उपसंचालक नगररचना विभाग मनीष भिष्णुरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे एम.हरीश, नॅशनल हायवे चे प्रकल्प संचालक जवादे,प्र. सार्वजनिक आरोग्य अभियंता सतीश एकबोटे, तपण डंके,रामचंद्र पेंटर, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



प्रवीण सिंह परदेशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल, तसेच प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्य करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.