सोलापूर – प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येत असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै, २०२५ अशी होती. तथापि, राज्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतकऱ्यांकडे Agristack Farmer Id नसणे, PMFBY पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार (UIDAI ) व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमीअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक/सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. 14 ऑगस्ट, 2025 व कर्जदार शेतकऱ्यांना दि. ३0 ऑगस्ट, 2025 पर्यंत विशेष बाब म्हणून केंद्र शासनाने मुदतवाढ दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना PMFBY पोर्टलवर स्वतः शेतकरी यांनी तसेच क्रॉप इन्शुरन्स App व सामुहिक सेवा केंद्र यांचेमार्फत योजनेत मोठया प्रमाणत सहभाग नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.