आम्ही दगड जरी उभा केला तरी तो मोदी फॅक्टर निवडून येऊ शकतो, हा भाजपच्या भ्रमाचा भोपळा अखेर फुटला. सोलापूर जिल्ह्यात प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाच्या एकमेव आमदार होत्या. उर्वरित दहा आमदार सत्ताधारी पक्षाचे होते. असे असताना सर्वसामान्य मतदारांनी लोकशाहीची ताकद काय असू शकते हे दाखवून दिले. त्यामुळे अवघ्या चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आपलं काय खरं नाही याची धास्ती सर्वच आमदारांनी घेतली आहे.
कोणत्याही मतदारसंघाचे आपण मालक नाहीत, जनताच मालक आहे हेच या निमित्ताने दिसून आले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान अवताडे असताना देखील त्या ठिकाणी प्रणिती ताईंना 45 हजाराच लीड मिळालं. कसं राजन पाटील मालक म्हणतील तसं असं समीकरण असलेल्या मोहोळ मतदार संघात देखील राजन पाटलांची जादू चालली नाही. राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने अजितदादा गटाचे असताना देखील या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना तब्बल 63 हजाररांचे मताधिक्य मिळाले. सोलापूर शहर उत्तर हा भाजपचा बालेकिल्ला. आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या विजयकुमार देशमुख यांनी ५०००० लीडचा अंदाज व्यक्त केला होता प्रत्यक्षात या ठिकाणी अवघे 35900 चे लीड मिळाले. तर सुभाष देशमुख यांच्या दक्षिण मतदार संघात प्रणिती शिंदेंनाच 9400 चे लीड मिळाले.
आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अक्कलकोट मतदार संघात भाजपला अवघे 9200 ची लीड मिळाले. सोलापूर शहर मध्ये अवघी 796 मध्ये प्रणिती शिंदे यांना अधिक मिळाली. अशीच गत माढा मतदारसंघात झाली. भाजप विरोधी त्सुनामी लाटने विद्यमान खासदाराला तब्बल एक लाख वीस हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. अजितदादा गटाचे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघात मोहिते पाटलांना 41500, आमदार बबनदादांच्या माढा मतदारसंघात तब्बल 52 हजार 500 चे, लीड धैर्यशील मोहिते पाटलांना मिळाले. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदार संघात अवघे 4400 चे लीड खासदार रणजीत निंबाळकर यांना मिळाले.
त्यामुळे ज्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांचे देखील मतदारांनी ऐकले नाही असे दिसते. बार्शी मध्ये आमदार राजा राऊत असताना देखील त्या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभेचे ठाकरे गटाची उमेदवार ओमराजे यांना तब्बल 55 हजाराचे लीड मिळाले. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दहा आमदारांची पायाखालची वाळू घसरली आहे हे नक्की.