येस न्युज मराठी नेटवर्क : मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजने अंतर्गत कालवा करते वेळी नुकसान झालेल्या फळझाडांचे नुकसान भरपाई पासून अनेक शेतकरी वंचीत राहिले आहेत.त्यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आमदार यशवंत माने ,लोकनेतेचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली.
सदर झालेल्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा होऊन पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सूचना केला.