त्रिपुरा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाचा निर्णय आपल्यासाठी सर्वोपरि आहे. हायकमांडच्या सांगण्यावरून त्यांनी आपले पद सोडले आहे. नवीन मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरा भाजप संघटनेत बिप्लव देब यांच्याबाबत नाराजी आहे. यामुळेच दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता, असं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वर्षी 2023 मध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ते संघटनेत कोणते पद स्वीकारणार हे अद्याप कळू शकले नाही.