सोलापूर -Yes News Marathi : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन “निमा” सोलापूर शाखा यांचेकडून रविवार दिनांक 23 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे वैद्यकीय क्षेत्रातील कायदेविषयक प्लाटिनो निमाकॉन 2023 या विभागीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्फरन्स साठी सर्व पॅथीचे हजाराहून अधिक डॉक्टर्स उपस्थित राहणार असून सकाळी नऊ ते सायंकाळी 5 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील विविध कायदेतज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असताना डॉक्टरांना प्रचलित कायद्यांचे अद्ययावत ज्ञान असणे गरजेचे आहे. कोरोना महामारी नंतर एकूणच जगामध्ये बदल घडून आला आहे. त्यानुसार बदलेले कायदे लक्षात घेऊन प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. शिवाय इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांचे अधिकार व मर्यादा , वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक अशी कागदपत्रे, त्यांचे रेकॉर्ड कसे ठेवावे? विविध सर्टिफिकेटस देताना नेमकी काय काळजी घ्यावी? ग्राहक संरक्षण कायद्यात नवीन समाविष्ट बाबी , अवयव प्रत्यारोपण करताना लक्ष्यात घेण्यायोग्य कायदेशीर बाबी या सर्व गोष्टींचा उहापोह या चर्चासत्राच्या दरम्यान होणार आहे . त्यासाठी या क्षेत्रातील कायदे तज्ञांचे अचूक मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे या विभागातील डॉक्टरांसाठी सदर कॉन्फरन्स ही महत्त्वाची व फायदेशीर ठरणार आहे.
कॉन्फरन्सच्या सुरुवातीला उद्घाटनावेळी निमा सोलापूर शाखेतर्फे उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक व संघटनेसाठी योगदान करणाऱ्या सोलापुरातील नामवंत डॉक्टरांना निमारत्न,धन्वंतरी व निमास्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कॉन्फरन्समध्ये दिवसभर विविध विषयावर कायदे तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यामध्ये डॉ.ज्योती भाकरे, डॉ. राजेंद्र खटावकर, डॉ.निशिगंध जाधव, डॉ. मुजाहिदन पठाण, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. धनंजय कुलकर्णी ,डॉ. नितीन कोथळे, डॉ. असिफ शेख व प्रसिद्ध मेडिको लिगल कन्सल्टंट डॉक्टर अरुण मिश्रा, सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांनी वैद्यकीय व्यवसाय करताना कायद्याचे ज्ञान आत्मसात करून आपले अधिकार व मर्यादां जाणून घेऊन प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यासाठी प्रचलित कायद्याचे अद्यावत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. म्हणून ही कॉन्फरन्स आयोजित केली आहे त्यासाठी सर्व इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांनी सदर कॉन्फरन्स ला उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा.
सदर कॉन्फरन्सच्या आयोजनासाठी कॉन्फरन्सचे चेअरमन डॉ नितीन बलदवा, सेक्रेटरी डॉ अमोल माळगे, खजिनदार डॉ सचिन पुराणिक प्रोजेक्ट हेड डॉ धनंजय कुलकर्णी, सोलापूर शाखेच अध्यक्ष डॉ. रविराज रविराज गायकवाड याच बरोबर डॉ सुभाष भांगे, डॉ शिवशंकर खोबरे, डॉ किरण देशमुख, डॉ अक्षय गांधी,डॉ सारिका होमकर , P.S.T. , वूमन फोरम, स्टुडन्ट फोरम आदी परिश्रम घेत आहेत. त्याच बरोबर पी पी डेव्हलपर्सचे चे पटेल यांनी प्रायोजत्वाची जबाबदारी घेतली असून आस्था किडनी केअर चे डॉ. पैके आणि हृदयम् हॉस्पिटल चे डॉ. शैलेश पाटील यांनी सहयोगी प्रायोजक म्हणून हातभार लावला आहे.
या पत्रकार परिषदेसाठी निमा सोलापूर शाखेतर्फे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ रविराज गायकवाड मेडीलाचे चेअरमन डॉ. नितीन बलदावा प्रोजेक्ट डॉ धनंजय कुलकर्णी सचिव डॉ अमोल माळगे पी.पी. डेव्हलपर चे खजिनदार डॉ सचिन पुराणिक ,शाखेचे सचिव डॉ खजिनदार सचिन बोंगरगे, शाखेचे प्रसिद्धीप्रमुख नागनाथ जिद्दी मनी आधी उपस्थित होते. ही माहिती निमा सोलापूर शाखेचे प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी दिले.