सोलापूर – गावस्तरावरील प्लास्टिक कचरा रस्ता बांधकामामध्ये वापर या पुढे बंधनकारक असणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
जिल्ह्यात सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक साठवण शेड व तालुकास्तरावर प्लास्टिक प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आली आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ची प्रभावी अंमलबजावणी करण्या साठी सोलापूर जिल्हा परिषदेने प्लास्टिक चा वापर कमी करणे साठी प्रबोधन करणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून संकलीत झालेले प्लास्टिक चा वापर रस्त्याच्या कामात होणे साठी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पत्रा द्वारे सिईओ जंगम यांनी सुचना दिले आहेत.
जिल्हात तालुका स्तरावर प्लास्टिक प्रक्रिया केंद्र सुरू करणे साठी प्रक्रिया सुरू आहे. गावस्तरावरील संकलित होणारे व पुनरप्रक्रिया योग्य प्लास्टिक प्रक्रिया अंतर्गत तुकडे करणे, बेल, ग्यानुल बनवणे ची प्रक्रिया सुरू आहे.
पुनरवापर अंतर्गत प्लास्टिकचा उपयोग रस्ते बांधकामामध्ये करणे अनिवार्य करणेत आले आहे. . जिल्ह्यातील तालुकास्तरीय प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया केंद्रातील उपलब्ध प्लास्टिक चा अहवाल स्वच्छ भारत मिशन कक्षात घेऊन जिल्ह्यातील प्लास्टिक डांबरी रस्ते निर्मिती मध्ये वापर होणे साठी नियोजन करण्यात येणार आहे. .
जिल्ह्यामध्ये प्लास्टिक वापर करून तयार करण्यात आलेले डांबरी रस्ते अहवाल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा कडे सादर करणेचे सुचना सिईओ जॅगम यांनी दिले आहेत. या बाबत प्लास्टिक संकलन व प्रकिया करणे साठी क्लस्टर करणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले.