मनपा विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांचे आवाहन
सोलापूर, प्रतिनिधी : मोबाईलमुळे हौशी फोटोग्राफरची संख्या वाढत चालली आहे. यामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. छायाचित्रकारांनी आपली ताकद व प्रतिमा जपतानाच छायाचित्रकारानी आपल्या कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नावर प्रकाश टाकावा अशी आवाहन महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केले. गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध दैनिकातील, वृत्तवाहिन्यतील छायाचित्रकारांचा यथोचित सत्कार यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे सागर सुरवसे, संतोष शिरसाठ, समाधान वाघमोडे, कृष्णकांत चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सागर सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे यांनी केले, आभार खजिनदार संतोष शिरसाठ यांनी मानले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ फोटोग्राफर कृष्णकांत चव्हाण यांनी मनोगत केले.
या छायाचित्रकारांचा झाला सन्मान
मिलिंद राऊळ, यशवंत सादुल, संदीप वाडेकर, नितीन कटके, केवल तिवारी, आप्पा बनसोडे, प्रमोद हिप्परगी, मनोज हुलसुरे, आयुब कागदी, विक्रांत कालेकर, विनोद हुमनाबादकर, विजय आवटे, रवी पवार, दिनेश शिंदे, आदित्य केंगार, संतोष धोत्रे, अनिल कांबळे, नागेश खराडे ,वसीम आतर, जगन वाघमारे, रोहित थळवे, आकाश कुरापाटी, तोसिफ शेख, यासीन शेख, खलील शहानुरकर, चंदन बोल्लू, रोहन श्रीराम, रजाक शेख,नागेश खराडे, दिनेश शिंदे, विजय कालेकर, यश वाघमोडे, दिनेश तावस्कर,यासिन शेख, अकबर बागवान, रवी काकडे आदींचा सत्कार करण्यात आला.