सोलापूर : प्रत्येक गोष्ट राजकीय आहे. त्यामुळे आजच्या मुला-मुलींना राजकीय गोष्टी समजल्या पाहिजेत स्वतःचे राजकीय मत व्यक्त करता आले पाहिजे. मात्र सध्या राजकारणात भलतेच काहीतरी घडत आहे कारण सध्या लोकांचा राजकर्त्यावर अंकुश नाही. त्यामुळे तरुण मुला-मुलींनी राजकारण समजून घेतलं पाहिजे असे मत दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ कुमटेचे अध्यक्ष सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रम्हदेव माने यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी आज संजय आवटे यांनी पहिले विचार पुष्पगुंपले.
व्यासपीठावर माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, शिक्षण प्रसारक मंडळ कुमठेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने, उद्योजक प्रल्हाद काशीद उपस्थित होते.
प्रारंभी ब्रह्मदेव माने यांच्या प्रतिमेस फुले पाहून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर जयकुमार माने यांनी प्रास्ताविकेमध्ये संस्थेची वाटचाल आणि व्याख्यानमालेचा उद्देश सांगितला.संजय आवटे यांनी आपल्या बहारदार भाषणात विविध मुद्दे मांडत कधी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढत तर कधी मताचे मूल्य सांगत अनेकांना विचारमंथन करायला लावले.बळीराम काका साठे यांनी आपल्या भाषणात ब्रह्मदेव माने यांनी केलेले सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य तसेच त्यांची कार्यपद्धती सर्वांसमोर मांडली.मनोज कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रकाश काशीद यांनी उपस्थितांचे आभार मानले.