अजित दादा यांचे विचार आणि दादांनी मंजूर केलेल्या योजना घरो – घरी पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू…महेश कुलकर्णी { महाराष्ट्र युवक प्रदेश सचिव}
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात महेश कुलकर्णी यांची महाराष्ट्र युवक प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल जुनी मिल येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात नूतन महाराष्ट्र युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी महेश कुलकर्णी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अजितदादा व तटकरे साहेबांनी विश्वासाने सोपवलेल्या संधीचे नक्कीच सोने करू.येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी व अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी युवकांची सर्वोतोपरी ताकद नक्कीच उभी करू.अजित दादांचे विचार दादांनी मंजूर केलेल्या योजना व त्याचा लाभ जनसामान्यांना मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे ही मत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केलं…
या सत्कार सोहळा प्रसंगी युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का,शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे युवक संघटक दत्तात्रय बडगंची,युवक शहर उपाध्यक्ष ओंकार हजारे,महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल,सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,विकास शिंदे आदी उपस्थिती होते …