येस न्युज मराठी नेटवर्क : कृषी कायद्यावर आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव मांडत चर्चेची मागणी करण्यात आली. परंतु, राज्यसभेच्या आजच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली.
काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी राज्यसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेसाठी नोटीस दिली होती. तसंच इतर विरोधी दलांकडूनही शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली. १२.३० वाजता पुन्हा एकदा उपसभापतींनी सदनात दाखल होत राज्यसभेचं कामकाज ३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्थात उद्यापर्यंत तहकूब करण्यात आल्याचं जाहीर करण्याचं काम पार पाडलं.-तत्पूर्वी राज्यसभेचं कामकाज एकाच दिवशी सलग तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आलं.