सोलापूर : परसबाग सोलापूरच्यावतीनें विजापूर रोड परिसरातील राजस्व नगर रोड जवळच्या निवासी भागात झाडाचा वाढदिवस या नवीन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
सौ.अंजलीताई इंगळे या परसबाग सोलापूरच्या सदस्या आहेत.त्यांनी गेल्यावर्षी याच दिवशी नव्यनें बांधलेल्या घरासमोर पारिजातकाचे झाड लावले होते.त्या झाडाचा मोठ्या उत्साही वातावरणात नाविन्यपूर्ण असा वाढदिवस साजरा करण्यात आला.सौ.अंजलीताईं व कुटुंबियांनी झाडाला स्नान घातले. झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ केला. सजावट केली. सौ.अंजलीताई, श्री.जीवनदास आणि त्यांच्या कुटुंबियांनी झाडाला औक्षण केले. चिरंजीव अथर्व याने केक कापला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात झाडाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रुपचे श्री.नारायण पाटील, जितेंद्र भडंगे, राजेंद्र आंबले,प्रतिक नाईकवाडी,आनंद गावडे,धनंजय हंदिगोळ तसेच श्री.बाळासाहेब माशाळ आणि इंगळे कुटुंबियांचे स्नेहीजन उपस्थित होते.