7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून हातमागवरील जीएसटी प्रश्न व इतर मागणी करिता पद्मशाली समाज बांधवांनी सात ऑगस्ट रोजी दिल्लीत लॉन्ग मार्च चे आयोजन केले होते. काही अपरिहार्य कारणास्तव सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघम चेही.
या आंदोलनात सहभागी नोंदविला समाजाचे लॉन्ग मार्च स्थगित झाल्याने पद्मशाली समाज बांधव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन केंद्र सरकारने हातमागवरील 12 टक्के जीएसटी तर लावू नये व असलेले ५ % जीएसटी रद्द करावी अशी मागणी केली याप्रसंगी अखिल सोलापुरातून अखिल भारतीय युवजन संगमचे सचिव सूर्यकांत जिंदम, गोविंद चिंता, सिद्धेश्वर कमटम, रवी गड्डम, नितीन मार्गम, अंबादास अमृतम, वासू यलदंडी, योगेश मार्गम, दीपक राजूल, बिपिन झुंजूर, अजय कोंगारी, भालचंद्रा श्रीगादी, अंबादास जल्ला, भारत पेटी आदी पद्मशाली विणकर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
हातावरचे पोट असणाऱ्या विणकर समाज बांधवांवर जीएसटी कर हा अन्याय करणारा निर्णय आहे. समाज बांधवांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जीएसटी करातून मुक्त करावे अशी भूमिका अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे यांनी मांडली. या प्रसंगी संपूर्ण भारतातील पद्मशाली समाज बांधव आणि सोलापुरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.