सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सम्राट चौक येथील पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी,उद्योजक केतन शहा,इंद्रमल जैन, हर्षल कोठेरी, डॉ. श्रीकांत येळगावकर, प्राचार्य डॉ.सुरेश पवार,इतिहास अभ्यासक नितीन अनवेकर, उद्योजक शशिकांत पाटील, मधुकर श्रीवास्तव चंद्रकांत घुले, राहुल कांबळे, अस्मिता बालगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.