येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागातील शहर व हद्दवाढ भागातील मिळकत कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने आयुक्त पी शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत खुल्या जागेवरील थकबाकी असणाऱ्या मिळकत करांच्या सिटीसर्वेचा उताऱ्यावर बोजा चढवणे त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत बैठक घेण्यात आली.
त्यानुसार शहर व हद्दवाढ विभागातील मिळकत कराच्या थकबाकीदारांची थकबाकी न भरल्यास त्यांच्या नावे असलेल्या सिटीसर्वे च्या उताऱ्यावर थकबाकी रकमेचा बोजा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच महापालिकेच्या अधिनियमतील तरतुदी नुसार सदर स्थावर व जंगम मालमतेचा संबंधित असलेल्या प्रसंगी जमा करून जाहीर लिलाव करून थकबाकी रक्कम वसूल करण्याचे कारवाई घेणार आहे. तरी सर्व मालमत्ता कराची थकबाकीदारांनी आपल्या मिळकतीच्या व खुल्या जागेच्या मिळकतधारकांनी मिळकत कर तात्काळ भरून घ्यावे असे आव्हान करण्यात आले.या बैठकीस उत्तर व दक्षिणचे तहसीलदार तसेच सहाय्यक आयुक्त महानगरपालिका श्रीराम पवार, टॅक्स विभागाचे प्रमुख पी.व्ही थोडसरे, हद्दवाढ विभागाचे प्रमुख रुउफ बागवान आदी अधिकारी उपस्थित होते.