सोलापूर : सोलापूर क्रेडाईच्यावतीने प्लॉट, फ्लॅटस्, रो हाऊस आदीचे यंदा दि १७ ते २० डिसेंबर दरम्यान भव्य एक्स्पो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष शशिकांत जिट्टीमनी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
नॉर्थ कोट मैदान येथे शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी स. १०.३० वा. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या शुभहस्ते व मेटारोल इस्पात लि. चे संचालक आशिष भाला, स्टेट बँक ऑफ इंडियाचे महेश्वर प्रसाद क्षेत्रिय व्यवस्थापक राजीव गुप्ता, संदीप देऊळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष हा सोहळा संपन्न होणार आहे. हे प्रदर्शन १७ तारखेपासूम सोमवार दि. २० डिसेंबर पर्यंत दररोज स. १० ते रात्री ९ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. प्रदर्शनास दोन्ही लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी वुमन्स विंग व युथ विंग क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण, शैक्षणिक दौरा, सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. या पत्रकार परिषदेस क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभय सुराणा, सचिव आनंद पाटील, अभिनव साळुंके, माजी अध्यक्ष किशोर चंडक, आदी उपस्थित होते.