सोलापूर येथे चैत्र शुध्द १ गुढीपाडवा मंगळवार दि. ०९ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत श्रीराम मंदिर देवस्थान बाळीवेस येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून प्रवचन, नामसंकिर्तन, महिला मंडळ भजन इ. समावेश आहे. श्रीरामचंद्र जन्मोत्सव सोहळयामध्ये विविध कार्यक्रम होणार असल्याचे मंदिराच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महिला मंडळाच्या भजनामध्ये दि. ९ ते १८ एप्रिल दैनंदिन दुपारी ३ ते ५ या वेळेत दि. ९ रोजी औसेकर भजनी मंडळ, दि. १० रोजी बासवीकन्यका भजनी मंडळ, दि. ११ रोजी राधिका भजनी मंडळ, दि. १२ रोजी मश्रुम गणपती भजनी मंडळ, दि. १३ रोजी शिवालय भजनी मंडळ, दि. १४ रोजी श्री संत नामदेव सांप्रदायिक भजनी मंडळ, दि. १५ रोजी श्री राम नगर भजनी मंडळ, दि. १६ रोजी श्री. नामदेव मंदिर भजनी मंडळ, दि. १७ रोजी राधाराणी महिला भजनी मंडळ
प्रवचनामध्ये दि. ९ ते १८ एप्रिल दैनंदिन सांय, ६ ते ७ या वेळेत दि. ९ एप्रिल रोजी अरुण मुनावळी, दि. १० रोजी हभप डॉ. रंगनाथ महाराज काकडे दिनांक ११ रोजी रत्नप्रभा सहस्त्रबुध्दे, दि. १२ रोजी ह.भ.प. हरिप्रसाद धर्माधिकारी, दि. १३ रोजी, सामुदायिक श्री रामरक्षा स्त्रोत पठण डॉ. अपर्णा कल्याणी, दि. १४ रोजी डॉ. गौरी बाचल यांचे व्याख्यान, दि. १५ रोजी श्रीनिअंबा नृत्यालय प्रस्तुत श्रीराम कथा भरतनाट्यम शैलीतून सादर, दि. १६ रामरतनधन स्वरानंद प्रस्तुत भक्तीसंगीत.
नामसंकिर्तनातून दिनांक ९ रोजी ह.भ.प. हरिदास शिंदे,
दि. १० रोजी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे,
दिनांक ११ रोजी ह.भ.प. विठ्ठल महाराज खंदारे,
दि. १२ रोजी ह.भ.प. शाम महाराज जोशी,
दि. १३ रोजी ह.भ.प. आबा महाराज पाटील,
दि. १४ रोजी श्री. सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर, यांचे सांयकाळी ७ ते ९ चक्री भजन,
दि. १५ रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास
तर दि. १६ रोजी सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर (सहअध्यक्ष श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर.).
शिवाय दि. १७ एप्रिल सकाळी १० ते १२ श्रीराम जन्मोत्सव सोहळा गुलालाचे किर्तन, ह.भ.प. निलेश महाराज चव्हाण तर गोपालकाल्याचे किर्तन दि. १८ एप्रिल रोजी १० ते १२ ह.भ.प. दत्तात्रय महाराज क्षिरसागर यांचे होणार आहे.
दि. १७ रोजी श्रीराम जन्मोत्सव दिनी पहाटे ५ ते ७ पर्यंत श्री प्रभू रामचंद्राच्या मुर्तीस वेदमुर्ती श्री सिंहराज गवई यांच्या शुभहस्ते पंचसुक्त पवन नामाचा अभिषेक होईल. तद्नंतर श्रींचे विधीवत पूजन व महाआरती होणार आहे. सांय. ५.३० वाजता प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची पालखीतून दिंडीसह टाळमंदुगांच्या गजरात रामनामाच्या जयघोषात मिरवणुक निघणार असून विशेष म्हणजे सूर ताल लय यांचा सुरेख संगत साधत बाल व महिला वारकरी पाऊल सादर करीत आहेत. दिंडीनंतर महाप्रसाद होणार आहे.
तरी रामभक्तांनी राजाधिराजप्रभु श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास श्रीराम मंदिर बाळीवेस येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.