मिरजेत श्री मद्भागवत सप्ताहाचे आयोजन; अधिक मासामुळे दत्तभक्तांकडून आयोजन

0
34

सांगली ( सुधीर गोखले) – मिरजेच्या प्रसिद्ध ऐतिहासिक श्री मैदान दत्त मंदिर येथे अधिक मासानिमित्त दि ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट श्री मद्भागवत सप्ताहाचे आयोजन मंदिरातील दत्तभक्त परिवाराकडून करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रवचनकार मोहनाताई चितळे, पुणे या सात दिवस श्री मदभागवत गीतेवर आपल्या ओजस्वी वाणीने भक्तमंडळींना मंत्रमुग्ध करतील तर सात दिवस मिरजेतील नागरिकांना एक प्रकारची पर्वणी ठरणार असल्याचे मत दत्तभक्त सुधीर भावे यांनी व्यक्त केले ते म्हणाले मिरजेतील काही दत्तभक्त मंडळी मिळून श्री मद्भागवत सप्ताहाचे आयोजन करत आहोत हा कार्यक्रम विनामूल्य असून मिरजेतील नागरिकांनी या श्रवणाचा लाभ घ्यावा मोहनाताई चितळे यांनी अनेक देशांमध्ये या आपल्या अतुलनीय ज्ञानाने विचारांनी भक्तगणांना भक्ती रसात चिंब भिजवले आहे.

दि ७ ऑगस्ट पासून १३ ऑगस्ट पर्यंत रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हा ज्ञान यज्ञ चालणार असून रोज श्री मद्भागवत गीतेवर आपल्या मधुर तेजस्वी वाणीने सौ मोहनताई प्रवचने देतील हा कार्यक्रम श्री मैदान दत्त मंदिर मध्ये होणार असून सर्वाना प्रवेश मोफत आहे सर्वांसाठी आसन व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. या वेळी सतीश पंडित विनायक सावंत यांच्यासह मोठ्या प्रमाणावर दत्त भक्त उपस्थित होते.