सोलापूर : जिल्हयात १५ आॅक्टोबर निमित्त जागतिक हात धुवा दिना निमित्त एक लाख विद्यार्थी सहभागी होणार असून आॅनलाईन द्वारे हात धुणेचे प्रात्यक्षिके करून दाखविले जाणार आहे. जिल्हा स्तरावरून कंट्रोल रूम करून हा उपक्रम केला जाणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत विद्यार्थी या मध्ये सहभागी होणार आहेत. दि. १४ व १५ आॅक्टोबर या दोन दिवसात ही प्रात्यक्षिके होणार आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा स्वच्छतेत आग्रही राहिल. स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविला आहे.
फोटो ओळी – स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2021 अंतर्गत मोबाईल अॅप चे लोगोचे अनावरण राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी, खाजगी सचिव अशोक पाटील, पाणी व स्वच्छता चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, विशेष कार्यकारी अधिकारी डाॅ. गणेश बडे, कार्यकारी अभियंता डी एफ कोळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, नगरसेवक गुरूशांत धत्तुरगावकर दिसत आहेत.