ग्रामरोजगार सेवक यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

0
223

सोलापूर (समाधान रोकडे) : सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या पूनम गेटसमोर सोलापुर जिल्हयातील तालुका दक्षिण व उत्तर सोलापुरातील महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीने माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्र सरकारला आपल्या मार्फत कळविण्यात यावे असे निवेदना द्वारे सांगण्यात आले सदर निवेदन देताना तालुका उत्तर सोलापूर चे तालुकाध्यक्ष सचिन बारस्कर चंद्रकांत जांबळे मामा दक्षिण सोलापूरचे तालुका अध्यक्ष दयानंद कांबळे उपाध्यक्ष म्हाळाप्पा गावडे परमेश्वर मोरे महेश डोगे तसेच तालुका दक्षिण व उत्तर सोलापूर चे सर्व ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते